

Pune Kondhwa Water Shortage Leaves Residents Waiting Despite Paying Property Tax and Water Charges to PMC
esakal
कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील टिळेकरनगर, साईनगर, सुखसागरनगर, गोकुळनगर, माऊलीनगर, संतोषनगर सह परिसरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची अनियमितता, वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे आणि कमी दाबाने पाणी मिळण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. टिळेकरनगर येथील थ्री ज्वेल्स सोसायटीने या समस्येबाबत पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे लेखी ईमेलद्वारे पाठपुरावा केला आहे. १६८० सदनिका असलेल्या या सोसायटीकडून तक्रारीचे शेकडो ईमेल महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाला केले आहेत.