बारामतीकरांना घडणार कोकण दर्शन; एसटी बस सेवा सुरु

मिलिंद संगई
Tuesday, 22 December 2020

बारामती आगारातून बारामती - कोकण दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साधी बस सुरु करण्यात आली आहे. कोकणाकडे जाणारी बस बारामतीतून सकाळी सात वाजता सुटणार आहे.

बारामती : एसटीनेही आता हळुहळू व्यावसायिकतेच्या अंगाने विचार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना हव्या असलेल्या ठिकाणी त्यांना जाता यावे या उद्देशाने आता बारामतीकरांना एसटीने कोकणदर्शन घडणार आहे. एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. 

बारामती आगारातून बारामती - कोकण दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साधी बस सुरु करण्यात आली आहे. कोकणाकडे जाणारी बस बारामतीतून सकाळी सात वाजता सुटणार आहे. ही  बस कोयना नगर डॅम गार्डन, डेरवण संगमेश्वर गणपतीपुळे, रत्नागिरी थिबा पॅलेस, सुरुबन-बीच, भगवती किल्ला, मार्लेश्वर ही पर्यटनस्थळे पाहून बारामती येथे रात्री अकरा वाजता पोचेल. या बसचे फक्त  तिकीटाचे प्रति प्रवासी प्रवास भाडे 1020 रुपये इतके आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2 जानेवारीला बारामती आगारातून बारामती - अष्टविनायक दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साधी बस सुरु करण्यात आलेली आहे. बारामती - अष्टविनायक दर्शन ही फेरी बारामती येथून सकाळी वाजता सुटणार आहे. या बसचे भाडे 930 रुपये इतके आहे.

28 डिसेंबर रोजी बारामती आगारातून बारामती - गाणगापूर दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साधी बस सुरु करण्यात आलेली आहे. बारामती - गाणगापूर दर्शन ही फेरी बारामतीतून 9 वाजता सुटणार आहे. अक्कलकोट (स्वामी समर्थ समाधी परिसर) पाहून गाणगापूर मुक्कामी राहणार आहे.  29 डिसेंबरला दत्त जयंती असल्याने दुपारी एक वाजता निघणार आहे. 
 

#nightcurfew: पुणे शहरात कर्फ्यूचं स्वरुप कसं असणार? महापालिकेनं दिली माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Darshan bus starts from Baramati