esakal | कोकणचा अस्सल हापूस थेट घरपोच! कसा ते वाचा

बोलून बातमी शोधा

Sakal Map
कोकणचा अस्सल हापूस थेट घरपोच! कसा ते वाचा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - उन्हाळ्याचा हंगाम आणि कोकणातील हापूस आंब्याचे अतूट नाते आहे. याच नात्याला जागत ‘सकाळ मॅप’मार्फत नैसर्गिकरीत्या पिकविलेला कोकणातील अस्सल आणि खात्रीशीर हापूस आंबा घरपोच देण्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने माफक दरात आंब्यांची विक्री केली जात आहे. सोसायटी बुकिंग किंवा बल्क खरेदीवर विशेष सवलत दिली जात आहे.

केशरी रंग आणि सुमधुर, अवीट गोडीचा कोकणातील हापूस आंबा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आपल्या घरात एखादा जरी अस्सल हापूस आंबा असेल तर त्याचा मधाळ सुगंध सर्वत्र दरवळत असतो. मग, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. कोकणातील लाल मातीमधील डेरेदार झाडांना लगडलेला सुमधुर हापूस आंबा तुम्हाला खास सवलतीच्या दरात आणि तोही थेट घरपोच उपलब्ध करून दिला जात आहे. हे आंबे विकत घेण्यासाठी कोकणात अथवा दूरवरच्या बाजारपेठेत देखील जाण्याची गरज नाही. हवा तेवढा हापूस तुम्हाला देण्यासाठी ‘सकाळ मॅप’ ने पुढाकार घेतला आहे. एरवी आवडीने आणलेला आंबा कोकणचाच आहे ना, याबद्दल तुमच्या मनात शंकाही डोकावत असतील; पण आम्ही तुम्हाला घरपोच देत असलेले आंबे हे कोकणातील शंभर टक्के अस्सल हापूस आंबे आहेत. आंब्यांची निवड (सॉर्टिंग) करतानाच त्याचा आकार, रंग आणि मधूर चव लक्षात घेतली जाते. त्यानंतरच त्याचे कोविड सुरक्षा नियम पाळून पॅकिंग केले जाते. यामुळे नैसर्गिकरीत्या पिकविलेला हापूस जसाच्या तसा ग्राहकांपर्यंत पोहचतो. दर्जेदार पॅकिंग आणि योग्य निवड यामुळे आंबा खराब होण्याची शक्यता फारच कमी आहे. आमचा हा कोकणचा हापूस महोत्सव ३० मे पर्यंत सुरु राहणार आहे.