Police officials presenting details of the ₹54 lakh seized in the 14-crore fraud case
पुणे : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींकडून ५४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी या जोडप्याची एकूण १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय ४२, दोघे रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (वय ६५, रा. वाडीवरे, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर वेदिकाची आई व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.