Pune News : फसवणूक केलेले १४ कोटी महिनाभरात परत करू; आरोपींचे न्यायालयात हमीपत्र सादर; संगणक अभियंत्यासह पत्नीची फसवणूक प्रकरण!

Kothrud Fraud : कोथरूडमधील संगणक अभियंत्याने पत्नीबरोबर १४ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी न्यायालयात ३० दिवसांत पैसे परत करण्याची हमीपत्र सादर केली आहे.
Accused in Kothrud fraud case promise court to return ₹14 crore within 30 days

Accused in Kothrud fraud case promise court to return ₹14 crore within 30 days

Sakal
Updated on

पुणे : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींनी जोडप्याकडून उकळलेले पैसे ३० दिवसांत परत करण्याची हमी (पुरशीस) न्यायालयात सादर केली आहे. आरोपींनी या जोडप्याची एकूण १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय ४२, दोघे रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (वय ६५, रा. वाडीवरे, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com