Kothrud News : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या श्वानमालकांना महापालिकेचा दणका; कोथरूडमध्ये १० जणांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड!

Dog Owners Fined : कोथरूड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी श्वानांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने जनजागृतीसह दंडात्मक मोहीम राबवली; यात गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावले
PMC Imposes Fine on Dog Owners for Public Uncleanliness in Kothrud

PMC Imposes Fine on Dog Owners for Public Uncleanliness in Kothrud

Sakal

Updated on

कर्वेनगर/ कोथरूड : ‘स्वच्छ भारत अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रभाग १२ मध्ये श्‍वानमालकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सकाळच्या वेळी श्‍वानांना फिरवताना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या श्‍वानमालकांना सूचना देत, गांधीगिरीच्या माध्यमातून गुलाबपुष्प देऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावण्यात आले, तसेच नियम न पाळणाऱ्या १० श्‍वानमालकांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com