
पुणे : कोथरूडमधील (कै.) नानासाहेब सुतार दवाखाना हा नागरिकांना उपचारासाठी चांगला पर्याय ठरत आहे. येथे रुग्ण रांगा लावून उपचारासाठी येत आहेत. परंतु रुग्णांना बसण्यासाठी असलेल्या बाकांवरच गळती होत असल्याचे शनिवारी दिसून आले. त्यामुळे उपचारांच्या सुविधा असल्या तरी भौतिक सुविधांकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी तेथील रुग्णांनी केली.