Pune Crime : मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; कोथरूडमधील सहा आरोपींना अटक

Kothrud Murder Case Pune : पुण्यातील कोथरूड परिसरात एका तरुणाचा मुलीशी बोलण्याच्या कारणावरून नातेवाइकांनी बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांची १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
Kothrud Murder Case Pune

Kothrud Murder Case Pune

Sakal

Updated on

पुणे : मुलीसमवेत बोलण्याच्या कारणावरून संतप्त नातेवाइकांनी तरुणाला इमारतीत बोलावून दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात शनिवारी (ता. १४) रात्री घडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अटक केलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com