Police Assault on Young Woman in Kothrud, Pune
पुणे : छत्रपती संभाजीनगरमधून पुण्यात आलेल्या एका तरुणीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकाने मारहाण, तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सहा पोलिस, एक निवृत्त पोलिस आणि पोलिसाच्या एका मैत्रिणीचा समावेश आहे. याबाबत एका तरुणीने शनिवारी (ता. १५) कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ॲट्रॉसिटी, विनयभंग, अपहरण, अवैध घुसखोरी आणि दरोडा टाकणे अशा विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.