
कोथरूड : कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीच्या मागील भागात असलेल्या जुन्या खाणीत मोठ्या प्रमाणात साठलेला कचरा व घाण पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसह अन्य त्रास सहन करावा लागत आहे. या खाणीतील दूषित पाणी व कचऱ्याचे निर्मुलन करून कायापालट करण्याचे काम सध्या सुरू आहे. घाण व कचऱ्यापासून होणारी मुक्तता ही येथील स्थानिक रहिवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब असणार आहे.