
पुणे : डुकरांच्या मृत्यूच्या घटना कोथरूडमध्ये थांबलेल्या नाहीत. मंगळवारी (ता. ११) पुन्हा पाच डुकरांचा मृत्यू झाला असून, एकूण संख्या ४७ झाली आहे. डुकरांच्या रक्ताचे नमुने महापालिकेने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवून चार दिवस झाले, अजूनही त्याचा अहवाल आलेला नाही.