

Sewage Overflow Troubles Kothrud Residents
Sakal
कोथरूड : घरासमोरून नियमित वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शास्रीनगरमधील अरमान सोसायटीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. महापालिकेचे कर्मचारी चेंबरची सफाई करून जात असले हे तरी सांडपाणी वाहणे बंद झालेले नाही. तक्रार केली तर आम्ही निवडणूक कामात व्यग्र असल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे आम्ही आता तक्रार कोणाकडे करायची, अशी व्यथा सोसायटीतील रहिवाशांनी ‘सकाळ’कडे मांडली.