शिवाजीनगर - कोथरूड, शिवाजीनगरमध्ये अनाधिकृत फ्लेक्स लावल्याने शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. या फ्लेक्समुळे पदचाऱ्यांना चालणे देखील मुश्कील झाले असून, वाहनचालकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही.
लाकडी फ्लेक्स असल्याने जोराचा वारा आल्यावर ते फाटून जातात. महापालिकेची निवडणूक जवळ येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत.