

Traffic Chaos in Kothrud: Promises Unfulfilled for Over a Decade
Sakal
कोथरूड : विकसित उपनगर म्हणून गौरविण्यात आलेले कोथरूड आता ‘कोंडीत अडकलेले उपनगर’ म्हणून ओळखले जात आहे. कोथरूडमधील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून दिले जात आहे. मात्र, ते अद्यापही खरे ठरलेले नसल्याचे वास्तव आहे. एका व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सेनापती बापट रस्ता व कर्वे रस्त्यावरून कोथरुडकडे येताना नळस्टॉप येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पूल उभारला.