Water and Power Supply Disrupted in Kothrud
Sakal
पुणे
Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!
Water Supply Disruption : कोथरूड परिसरात जलवाहिनी गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्याचवेळी वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
मयूर कॉलनी : कोथरूड भागामध्ये शुक्रवार (ता. २६) अनेक ठिकाणी एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवासी संतप्त झाले होते. नागरिकांना प्रथम पाण्याअभावी, त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने दोन्ही समस्यांना एकाच वेळी सामोरे जावे लागले.

