

Pune Sanitation Worker Reshma Pathan Overcomes Financial Struggles to Earn a Microbiology Degree Through Hard Work and Dedication
sakal
कोथरूड: पुणे महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय रेश्मा जहांगीर पठाण हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी मिळवली आहे. वस्तीमधील गोंगाट टाळण्यासाठी स्मशानभूमीतील शांततेत अभ्यास करून तिने हे यश संपादन केले असून, सध्या ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेत आहे.