विजेच्या लपंडावामुळे  कोथरूडकर हैराण 

वृत्तसंस्था
Wednesday, 16 September 2020

पुणे : कोथरूडमधील सृष्टी, वात्सल्यनगरी, गुरू गणेशनगर, वृंदावन, मौर्य गार्डन, शांतीबन, एकलव्य परिसर, रोहन गार्डन, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी या भागातील रहिवासी मागील अनेक दिवस खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करत आहेत

पुणे : कोथरूडमधील सृष्टी, वात्सल्यनगरी, गुरू गणेशनगर, वृंदावन, मौर्य गार्डन, शांतीबन, एकलव्य परिसर, रोहन गार्डन, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी या भागातील रहिवासी मागील अनेक दिवस खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करत आहेत, तर वारजे महावितरणच्या डहाणूकर केंद्राअंतर्गत गांधीभवन, वुडलॅंड, सहजानंद, कुमार परिसर, महात्मा सोसायटी ते शिवनगरीपर्यंत वारंवार वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

लॉकडाउन काळातील वाढीव लाइट बिले, बिलांची दुरुस्ती याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. आकारण्यात येणा-या बिलांचा तपशील प्रत्येक नागरिकास मिळावा, अशी रूपेश भोसले यांच्यासह नागरिकांची मागणी होती. 

या समस्यांवर तोडणा काढण्यासाठी रामबाग सोसायटी येथे असलेल्या वीज मंडळाच्या अधिका-यांशी बाळासाहेब टेमकर, भाजप पुणे शहराचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ जोरी, अभिजित गाडे, शुभांगी जोशी, विद्या टेमकर, नवनाथ वांजळे, आकाश कातुरे, उदय रेणूकर, वात्सल्यनगरी सोसायटीचे अविनाश क्षीरसागर, इंद्रायणी सोसायटीचे किरण पाटील, वात्सल्य पूरम सोसायटीचे नीलेश खळदकर, विजय राठोड यांनी संवाद साधला. वीज मंडळाच्या अधिका-यांनी लवकरच समस्या सोडवू असे आश्‍वासन दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kothrudkar harassed due to power outage