अरे वा ! कोथरुडकरांनी घरीच साकारल्या शाडूच्या गणेश मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कल्पना शक्तीचा वापर करत त्यामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लायन्स क्‍लब ऑफ पुणे 21 सेंच्युरीच्या लिओ क्‍लबने शंभराहून अधिक कुटुंबांना शाडूची माती पुरवत "आम्ही साकारू आमचा बाप्पा' हा उपक्रम राबवला.

कोथरूड (पुणे) : यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कल्पना शक्तीचा वापर करत त्यामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लायन्स क्‍लब ऑफ पुणे 21 सेंच्युरीच्या लिओ क्‍लबने शंभराहून अधिक कुटुंबांना शाडूची माती पुरवत "आम्ही साकारू आमचा बाप्पा' हा उपक्रम राबवला. महाविद्यालयीन युवकांनी यात पुढाकार घेऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विविध सोसायट्या, मंडळे व कुटुंबांना केले आहे. 

धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही, मग आम्ही जमिनी का द्यायच्या? शेतकऱ्यांचा शासनाला...

लिओ क्‍लबचे अध्यक्ष जय मैड म्हणाले, "घरी बनवलेल्या गणेश मूर्तीमुळे आपली जी बचत होते. त्याचा उपयोग आपण इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी करू शकतो. उदा. घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना मदत करणे, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणे.' 

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

 

गणेश मूर्ती विकत घ्यायला गेलो तर हजार रुपये खर्च येतो. तीच जर घरी बनवली तर शंभर रुपयांमध्ये सुबक, छान, कलात्मक मूर्ती तयार करता येते. आपण स्वतः मेहनत घेऊन सिद्ध केलेली मूर्ती ही नक्कीच पावन वाटते. 
- यशवंत खंडागळे, विद्यार्थी. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे सगळे जग अडचणींचा सामना करत असले तरी प्रदूषण पातळीत झालेली लक्षणीय घट ही सकारात्मक बाब आहे. आता या प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ नये यासाठी काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. याच हेतूने आम्ही पर्यावरणपूरक, कलात्मक गणेशोत्सवाची संकल्पना आखली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
शंतनू गोयल, विद्यार्थी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kothrudkar made Shadu's Ganesha idol at home