गणेशोत्सवात 'या' चार दिवशी रात्री बारापर्यंत सुरू राहणार स्पीकर; पुणे पोलिसांनी केले जाहीर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh_Festival_LoudSpeakers

उर्वरीत दिवसांसाठी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेपर्यंतच ध्वनीवर्धकाचा वापर करण्याचे आदेश पोलिसांनी गणेशोत्सवाच्या आचारसंहीतेमध्ये नमूद केले आहेत.​

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी रात्री बारापर्यंत सुरू राहणार स्पीकर; पुणे पोलिसांनी केले जाहीर!

पुणे : कोरोनाचे सावट असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ध्वनीवर्धक (स्पीकर) रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी चार दिवस मिळणार आहेत. त्याबाबत पुणे पोलिसांनी काढलेल्या आचारसंहीतेमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण देखावे तयार केले जातात. भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असणारे हेच देखावे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. देखाव्यांसाठी आवश्‍यक असणारे ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरू राहिल्यास उशिरा येणाऱ्या भाविकांनाही देखावे पाहता येतात. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरासाठी परवानी देण्याची मागणी पोलिसांकडे केली जाते. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर मंडळांना पाच दिवस मिळतात. 

Video : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच राहणार; हवामान खात्यानं दिलाय इशारा​

यंदा मात्र गणेशात्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा उत्सवाचे स्वरुप न देता गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यास मंडळांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनीवर्धक वापरासाठी चार दिवस निश्‍चित केले आहेत. त्यामध्ये २६ ऑगस्टचा पाचवा दिवस, २८ ऑगस्टचा सातवा दिवस आणि ३१ ऑगस्टचा दहावा दिवस, तर १ सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीचा एक दिवस असे चार दिवस सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर उर्वरीत दिवसांसाठी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेपर्यंतच ध्वनीवर्धकाचा वापर करण्याचे आदेश पोलिसांनी गणेशोत्सवाच्या आचारसंहितेमध्ये नमूद केले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)