Pune News : वेल्ह्यातील दहा गावातील कोतवाल भरती आरक्षण सोडत जाहीर...

दहा पैकी पाच ठिकाणी होणार महिला कोतवाल
Kotwal bharti 2023
Kotwal bharti 2023sakal
Updated on

वेल्हे : वेल्ह्यातील दहा गावातील कोतवाल भरती आरक्षण सोडत शुक्रवार (ता.२२ )रोजी जाहीर करण्यात आली .यामध्ये दहा पैकी पाच जागांवर महिला कोतवालांसाठी राखीव राहणार असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली. वेल्हे तालुक्यामध्ये १३० गावे असून यामध्ये २३ महसूलच्या सजा आहे.

यापैकी दहा जागांवर कोतवाल कार्यरत असून 13 ठिकाणच्या जागा रिक्त होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १३ सजांपैकी ८० टक्के म्हणजेच दहा सजांवरील भरती करणे प्रक्रियेसाठी गावनिहाय आरक्षण सोडतीची सभा पंचायत समिती सभागृह वेल्हे या ठिकाणी घेण्यात आली.

यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, महसूल लिपिक गोपाळ गोडवे व विष्णू जेधे वेल्हे बुद्रुकचे माजी उपसरपंच खंडू गायकवाड, तसेच आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी अवनी प्रमोद गायखे या लहान मुलीसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Kotwal bharti 2023
Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलचा सोहळा आजपासून रंगणार; कार्यक्रमांची रेलचेल

तेरा गावांपैकी ८० टक्के प्रमाणे १० गावातील जागांची सोडत करण्यासाठी एकूण १३ चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या यामधील तीन चिठ्ठ्या च्या जागांवरील आरक्षण सोडत होणार नसल्याच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये पानशेत, लव्ही बुद्रुक ,पासली या चिठ्ठ्या निघाल्याने राहिलेल्या दहा जागांवर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .

यामध्ये खालील प्रमाणे गाव कंसात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

१)आंबवणे :-(अनुसूचित जाती महिला)

२)वरोती बुद्रुक:- ( इतर मागासवर्ग महिला)

३) साखर :-(सर्वसाधारण महिला)

४) मालवली :-( ई डब्ल्यू एस महिला)

५) कानंद- भटक्या जमाती ड महिला प्रवर्ग

६) खामगाव :-(अनुसूचित जाती)

७) वरसगाव:- ( अनुसूचित जमाती)

८) शिरकोली:- (विमुक्त जाती अ प्रवर्ग )

९) रुळे:- ( भटक्या जमाती ब प्रवर्ग)

१०) केळद:- (सर्वसाधारण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com