
काळेबोराटेनगर रेल्वे स्थानकावर कोयना एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या मागणीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दाणवे यांनी हिरवा कंदील दिला.
कोयना एक्स्प्रेस काळेबोराटेनगर रेल्वे स्टेशनवर थांबणार?
उंड्री - काळेबोराटेनगर (Kaleboratenagar) रेल्वे स्थानकावर (Railway Station) कोयना एक्स्प्रेसला (Koyana Express) थांबा देण्याच्या मागणीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हिरवा कंदील दिला असून, मंडल अधिकारी रेणू शर्मा (Renu Sharma) यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही थांबा द्यावा, अशी मागणी माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी केली आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका विजया वाडकर, योगेश सूर्यवंशी, स्वाती कुरणे, अॅड. प्रमोद सातव, पोपट वाडकर, इम्तियाज मोमीन उपस्थित होते.
दानवे यांनी कोयना एक्स्प्रेस काळेबोराटेनगर रेल्वे स्टेशनवर थांबण्याला हिरवा कंदील दिला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या महालक्ष्मी, कोयना, सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्यांनाही थांबा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पुणे रेल्वे मंडल अधिकारी रेणू शर्मा यांच्याकडे केली आहे. यावेळी रेणू शर्मा यांनी रेल्वे बोर्डाला याबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले. लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही येथे थांबा दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.