कोथरुड - कोथरुड मधील सुतारदरा येथे कोयता गँगने धुमाकुळ घालत नागरिकांमध्ये दहशत पसरवली. गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक, ड्रम व इतर साहित्याची तोडफोड करत आपण येथील भाई असल्याचे आरडाओरडा करत सांगितले. सायंकाळी आठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कोथरुड मध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले.