बालगुन्हेगारी रोखण्यासाठी संस्कार,शिस्तीची गरज - कृष्ण प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

कुटुंबात होणारे अती लाड, संस्कार आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत आहेत. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन मुलांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे, असे मत कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. 

पुणे - ""बालगुन्हेगारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, बहुतांश गुन्हेगार हे सनाथ कुटुंबातील आहेत. या मागील कारणांवर विचार केल्यावर लक्षात येते की, कुटुंबात होणारे अती लाड, संस्कार आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत आहेत. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन मुलांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे,'' असे मत पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. 

पुणे : मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला उडवले; दोघे गंभीर जखमी​

रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था, "टॉक टू मी' व "विलास जावडेकर डेव्हलपर्स' यांच्या "सीएसआर' उपक्रमांतर्गत आयोजित "विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन' या बाल अपराधींच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यात पिंपरी-चिंचवड मधील 18 पोलिस स्थानकांअंतर्गत 234 बालगुन्हेगारांचे समुपदेशन, कल चाचणी, मानसिक चाचणी करण्यात येणार आहे. या वेळी परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे, सर्वेश जावडेकर, सचिन कुंदोजवार, प्राचार्य भरत कासार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नरेंद्र कंजीर आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस आयुक्त सागर कवडे यांनी सूत्रसंचालन केले. 

 देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुण्यात; जूनमध्ये होणार शुभारंभ!

कृष्ण प्रकाश म्हणाले की, बालगुन्हेगार घडण्यामागे बरीच करणे आहेत. त्यात प्रामुख्याने आवेगावर ताबा नसणे, चुकीचे संस्कार, व्यसने इत्यादी आहेत. सर्वेक्षणानुसार बालगुन्हेगारांत 99 टक्के मुलांचे प्रमाण आहे. 
- कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Prakash opinion on the need for rites and discipline to prevent juvenile delinquency