
बारामती - अत्य़ाधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सारख्या या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या संस्थांचीही मदत घेतली जाईल, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी होणा-या प्रयोगांनाही शासन प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.