

Poor Water Management Alleged as Kukadi Reservoirs Hit Critical Levels
esakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव : कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात 94 टक्के समाधानकारक उपयुक्त पाणीसाठा होऊन देखील नियोजनाच्या अभावामुळे कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात आज अखेर नीचांकी 1.49 टीएमसी (5 टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी कमी(90 टक्के ) साठा होऊन देखील आज अखेर कुकडी प्रकल्पात 3.11टीएमसी (10.49 टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणांनी तळ गाठला असताना पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्याचा वापर करून जलसंपदा मंत्री यांच्या दबावाखाली पिण्याच्या नावाखाली मागील वीस दिवसापासून कुकडी डावा कालव्यात 1400 कुसेक्सने पाणी पारनेर,कर्जत, करमाळा या तालुक्यांना शेती सिंचनासाठी कुकडी डावा कालव्यात सुरू आहे. कुकडी डावा कालव्यातील आवर्तन तातडीने बंद न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.