नगर ः कुकाणे परिसरात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांत घबराट, पोखर्डीत बिबट्या पकडला

नगर ः कुकाणे परिसरात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांत घबराट, पोखर्डीत बिबट्या पकडला
Published on: 

पान ६ नगर
------------
कुकाणे परिसरात बिबट्याचा संचार

शेतकऱ्यांत घबराट, पोखर्डीत बिबट्या पकडला

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : कुकाणे (ता. नेवासा) गावच्या लगत पूर्वेस लोंढे-गोर्डे वस्तीजवळ दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी अंबादास कचरे यांनी केली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या पोखर्डी शिवारात बिबट्या पकडला आहे.

कुकाणे येथील शेवगाव-नेवासे राज्यमार्ग असलेल्या शेतात तीन दिवसापूर्वी स्वप्नील कचरे दुपारी झेंडू पिकावर फवारणी करण्यासाठी आला असता त्यास दुपारी साडेतीन वाजता शेजारच्या अंबादास कचरे यांच्या तुरीच्या पिकात बिबट्या व तीन पिल्ले दिसली. त्याची चाहूल लागताच बिबट्या व पिल्ले शेजारच्या उसाच्या शेतामध्ये निघून गेली.

सध्या कपाशी काढण्याचे काम चालू आहे. बिबट्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही. त्यामुळे वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

--- चौकट ----
बिबट्या पकडला...
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी, पोखर्डी, वडगाव गुप्ता व परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर होता. पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. पोखर्डी शिवारात वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने २८ ऑक्टोबर रोजी पिंजरा लावला होता, त्यात बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.