जे प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवले जाते : कुमार सप्तर्षी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुणे : 'समाजात प्रश्न विचारणारे आवडत नाही. विचारले तर त्यांना देशद्रोही ठरवले जाते, असा काळात राजारामबापू पाटील यांच्यासारख्या नेत्यांची गरज समाजाला आहे,' असे प्रतिपादन युकांतचे नेते कुमार सप्तर्षी यांनी शुक्रवारी केले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते सप्तषी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री अण्णा डांगे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,भू माजी आमदार शरद पाटील, कुमार सप्तषी, दिलीप पाटील, नाथाभाऊ शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी पाठविलेला संदेश शरद पाटील यांनी वाचून दाखविला.

यावेळी ढाकणे म्हणाले, 'आज बापू असते, तर त्यांनी एनसीआर व सीएएच्या कायद्याला जोरदार विरोध केला असता. त्याविरोधात देशाभर मोर्चा काढले असते. आज देशात वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे.' देशात आज एकाच मंत्र शिल्लक आहे, तो म्हणजे नमो..नमायहे चांगले लक्षण नाही, असे सांगून सप्तषी म्हणाले, 'जात एक विशिष्ट दुष्टी देते. पण तुमचे कर्म तुम्हाला नवीन दुष्टी देते. राजारामबापूंचा कर्मावर विश्वास होता. त्यामुळे ते कर्मवीर होते. समाजात प्रश्न विचारणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. कारण तो समाजाचा हुंकार असतो.'

यावेळी अण्णा ढाकणे यांचे भाषण झाले. नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वागत केले. दिलीप पाटील यांनी प्रस्ताविक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumar Saptarshee speaks at rajarambapu patil birth anniversary program