Kunal Tilak: भाजपनं पराभवाचा...कुणाल टिळक यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal Tilak

Kunal Tilak: भाजपनं पराभवाचा...कुणाल टिळक यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले असून हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. (kunal tilak bjp kasba by election ravindra dhangekar win )

कसबा मतदार संघ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र, यावेळी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी टिळक कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुणाल टिळक नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, धंगेकर यांच्या विजयानंतर कुणाल टिळक यांनी भाजपनं पराभवाचा अभ्यास करण गरजेचं आहे. असं म्हटलं आहे.

रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा देत कुणाल टिळकांनी भाजपच्या पराभवार भाष्य केलं. 'जे काय मतदान झालं. जो काही मतदानाचा आकडा झाला आहे. त्यामागचा अभ्यासं करण गरजेचं आहे. एका दिवसांत विश्लेषण करण होणार नाही. कोणत्या बूथवर मतदान कमी पडलं. खरं काय कारण? या अभ्यास करायला हवं.

भाजपने जोमाने प्रचार केला. कोणत्याही मतदासंघात प्रचार झाला नसेल तसा प्रचार कसब्यात झाला. धंगेकर हे सामान्य जनतेसाठी नेहमी लढतात. त्यांचा जनतेत संपर्क चांगला आहे. त्याच जोरावर धंगेकर निवडूण आले आहेत. आईंच सर्वांसोबत नातं होतं.' अशी प्रतिक्रिया कुणाल टिळकांनी दिली आहे.

कसबा मतदार संघ हा भाजपचा गड मानला जातो. यामध्ये भाजपकडून नेहमीच ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला जातो आणि तो निवडून देखील येतो. मात्र, याचवेळी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यानंतर टिळक कुटुंबातच ही उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता असतांना शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांना ही उमेदवारी दिली जाईल अशी स्थिती होती. मात्र त्यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती.