
पाईट : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी पाईट येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी पाईट येथील शोकसभेत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखाने केली. पुढील १० दिवस गावासाठी सामुदायिक दुखवटा जाहीर केला आहे. तसेच, कुंडेश्वर येथील अपघातात जखमी रुग्णांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी पाईट व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पाईट गावामध्ये येत्या १० दिवसांत कोणताही सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले.