

Indrayani River Kundmala Dam Condition Raises Accident Fears as Villagers Demand Urgent Repairs and Traffic Restrictions
sakal
इंदोरी: कुंडमळा येथील इंद्रायणी नदीपात्रातील भौगोलिक रचना धोकादायक असतानाच, बंधाऱ्याची दुरवस्था आणि त्यावरून सुरू असलेली वाहतूकही अपघातांना निमंत्रण देत आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहत असतानाही पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक जीव धोक्यात घालून ये-जा करत आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि वाहतूक बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.