Tragedy Strikes Kundmala as Old Indrayani River Bridge Collapses Amid Tourist Rush :मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून 20 ते 25 पर्यटक इंद्रायणीत वाहून गेले आहेत. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.