
कुपवाड : शहरातील बजरंगनगर येथे तरुणावर धारधार हत्याराने वार करत खून करण्यात आला. आज रात्री सव्वा अकराच्या सुमारास झालेल्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली. उमेश मच्छिंद्र पाटील ( वय 20 वर्ष रा. कुपवाड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.