esakal | Kurkumbh: चोरटयांनी चक्क स्कॉर्पिओ गाडीतून एटीएम मशिन नेलं चोरून
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम मशिन चोरटयांनी स्कॉर्पिओ गाडीतून नेलं चोरून

कुरकुंभ : चोरटयांनी चक्क स्कॉर्पिओ गाडीतून एटीएम मशिन नेलं चोरून

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील एका गाळयामधील हिताची कंपनीचे एटीएम मशिनचं अज्ञात चोरटयांनी रविवारी ( ता. 10 ) पहाटे तीनच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरून नेल्याची घटना घडली. एटीएम मशिन व रोख रक्कम असा एकूण 8 लाख 19 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मात्र यासंदर्भात रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

यासंदर्भात हिताची कंपनीचे अधिकारी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हिताची कंपनीचे एटीएम मशिनच पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत चोरून नेल्याचे ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून येत आहे. अज्ञात चोरटयांनी गाळयातील लाईटची वायर व काचच्या वस्तूचे नुकसान करून एटीएम मशिनचं चोरून नेले.

हेही वाचा: पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार : आदित्य ठाकरेंचा टोला

एटीएममधील 6 लाख 69 हजार 100 रूपये रोख रक्कम व एटीएम मशिन असा एकूण 8 लाख 19 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र यासंदर्भात रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील व वाहनाची रात्रंदिवस रहदारी असलेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या एटीएमची चोरी होते याबाबत ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

loading image
go to top