भाजपाचे जाधव यांचा विजय फार कौतुकास्पद नाही,परंतु राष्ट्रवादीचे उमेश पाटलांचा निसटता पराभव भविष्यात जाचक
MOH26B03242 उमेश पाटील
MOH26B03243 सचिन जाधव
कुरूल जि. प. गट
गेटकेन उमेदवाराने भाजपला झुंजवले
भाजपच्या जाधव यांचा विजय; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा निसटता पराभव
राजकुमार शहा ः सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १२ ः संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील विरुद्ध भाजपचे सचिन जाधव अशी काटे की टक्कर झाली. या निवडणुकीत उमेश पाटील यांचा १३०३ मतांनी पराभव झाला. उमेश पाटील हे कुरुल जिल्हा परिषद गटात ‘गेटकेन’ उमेदवार. मात्र ते गेटकेन असूनही त्यांनी ९ हजार ८७१ मते मिळविली. हा निसटता पराभव सचिन जाधव यांना भविष्यात जाचक ठरणारा आहे. खुद्द कुरुल मधूनच उमेश पाटील यांना जादा मताधिक्य आहे.
उमेश पाटील यांचा पारंपरिक जिल्हा परिषद गट म्हणजे नरखेड. गेल्या निवडणुकीत पाटील यांनी या गटातून निवडून येऊन पाच वर्षे प्रतिनिधित्व केले होते. मात्र यावेळी त्यांचे बंधू शिंदे सेनेचे संतोष पाटील यांना या गटातून उमेदवारी मिळाल्याने उमेश पाटील यांना कुरुल गटातून निवडणूक लढवावी लागली. कुरूल पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनाजी माळी हे विजयी झाले. उमेश पाटील यांनी कुरुल परिसरातील रस्ते वीज पाणी या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. कुरुल पंचायत समितीची उमेश पाटील यांची खेळी यशस्वी ठरली.
सचिन जाधव तसे राजकारणात नवीनच. ते साखर कारखानदार आहेत. उद्योजकही आहेत. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सुमारे दोन हजार नागरिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यांचे नेटवर्क मोठे असून ते आर्थिक स्ट्राँग आहेत. एवढे साम्राज्य असूनही त्यांचा केवळ १३०३ मतांनी विजयी झाला. त्यांना अधिक मताधिक्य हवे होते असे बोलले जात आहे. जाधव यांच्या पाठीशी पालकमंत्री गोरे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने यांची ताकद होती. तर उमेश पाटील यांच्या पाठीशी आमदार राजू खरे यांची ताकद होती.
ग्रामीण भागातून भाजप यशस्वी
प्रचारादरम्यान आमदार खरे यांनी उमेश पाटलांच्या विजयासाठी जिवाचे रान केले मात्र भाजपची या ठिकाणची खेळी यशस्वी ठरली. मतमोजणी वेळी सचिन जाधव यांना वटवटे, मिरी, येणकी, घोडेश्वर या गावांनी मताधिक्य दिल्याने निकाल फिरला परिणामी जाधव यांचा विजय झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

