...म्हणून पुण्यातून प्रयागराज अन्‌ रिवाकडे जाणाऱ्या मजुरांचे डोळे पाणावले 

khadaki1.jpg
khadaki1.jpg

खडकी बाजार (पुणे) : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घोषणेनुसार स्थलांतरित मजुरांचा प्रवास खर्च कॉंग्रेस पक्ष करत असून आतापर्यंत हजारो मजुरांना स्वगृही पोहोचवण्यात आले आहे. सोबतच त्यांच्या जेवणाची, पाण्याची देखील सोय केली जात असून त्यांचा प्रवास अधिक सुखकर कसा होईल यावर भर दिला जात आहे. 

काल पुणे स्थानकावर साडेतीन हजार स्थलांतरित मजुरांना प्रयागराज आणि रिवा येथे घेऊन जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांमध्ये त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहचे पर्यंत पुरेल इतके पाणी, बिस्कीट, वेफर्स, नाश्‍त्याचे वितरण मनीष आनंद हेल्पलाइन तर्फे करण्यात आले. 

या वेळी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या पूजा आनंद व मनीष आनंद हेल्पलाइन चे कार्यकर्ते खडकीतील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याप्रसंगी हेल्पलाइनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बोगीमध्ये जाऊन परप्रांतीय प्रवाशांना पाण्याच्या बाटलीचे बॉक्‍स, बिस्कीट, वेफर्स दिले. तसेच पुढील प्रवास सुखाचा जावो अशा शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मजुरांचे डोळे पाणावले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com