दिवसभर काम केलं तर रात्री दोन घास पोटासाठी मिळतात पण लाॅकडाउनमध्ये मात्र.....

रितेश चाळेकर
सोमवार, 13 जुलै 2020

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मजूर अडुयावरील मजूरांमधे प्रचंड निराशा व चीड दिसून येत आहे. अगोदरच जवळपास तीन महिने बसून काढणारा हा मजूरवर्ग आता मात्र, या लॉकडाउनवर आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करत आहे.

आंबेगाव (पुणे) : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मजूर अडुयावरील मजूरांमधे प्रचंड निराशा व चीड दिसून येत आहे. अगोदरच जवळपास तीन महिने बसून काढणारा हा मजूरवर्ग आता मात्र, या लॉकडाउनवर आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करत आहे.
आंबेगाव परिसरातील दत्तनगर भागात असलेल्या मजूर अड्डयावर कामासाठी मोठया संख्येने मजूर रोज जमा होत असतात. बांधकाम तसेच इतर विविध कामासाठी या मजूरांना मागणी असते. मजूर अड्डयावर अगोदरच काम मिळवण्याची स्पर्धा असते, कधी वैयक्तिकरित्या तर कधी एखादया ठेकेदारामार्फत काम मिळत असते.

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

 कामाची खात्री सध्याच्या काळात कमीच अशातच आता हे लॉकडाउन या मजूरांच्या अडचणीत वाढ करणार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे. 'रोज काम केल तर आमचा पोटापाण्याचा पश्न सुटतो तर इतर खर्च आहेतच. कुटुंबाची जबाबदारीही आहे  अशा परिस्थित एक दिवसही हाताला काम नसेल तर आमचे हाल होतात. आता तर परत काही दिवस घरी बसायच आहे, अश्या परिस्थितीत दिवसात एक वेळच जेवण  करुन किंवा उपासमार सहन करून आम्हाला हा काळ घालवावा लागणार आहे तर ह्याच्या त्याच्याकडून व्याजाने पैसे घेउन आम्ही अगोदरच कर्जबाजारी झालो असल्याचे '  हे मजूर सांगत आहेत. तर लॉकडाउनच्या काळात आम्हाला विचारत कोण साहेब ? असा सवाल ही उपस्थित करत सरकारने आम्हाला मदत दयावी अशी मागणीही ते करत आहेत .

  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

" आम्ही गरीब माणस आहोत. मागील तीन महिने बसून काढले आमचे हाल आम्हाला माहित. रोज काम केल तर पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. मला दोन मूल आणि दोन मुली आहेत घर कस चालवायचा हा प्रश्न परत होणाऱ्या लॉकडाउनमुळे पडला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी"

रुपेश जाधव, मजूर अड्डयावरील मजूर.

" परत होणाऱ्या लॉकडाउनमुळे आता फक्त दिवसातून एकदा खाऊन दिवस काढावे लागणार आहे. कारण लॉकडाउनमध्ये आम्हाला कोण विचारतो "?

संजय गायकवाड, मजूर अड्डयावरील मजूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laborers nervous due to lockdown

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: