Corona Virus :दादा, आमचं हातावरचं पोट आता,आम्ही जगायच तरी कसं?

Labour are facing problem due to high prices in grocery store
Labour are facing problem due to high prices in grocery store
Updated on

पुणे : बटाटे, टोमॅटो , हिरवी मिरची प्रत्येकी 60 रूपये किलो..तर शेगदाणे 140 रूपये, तेलाची 1 लिटरची पिशवी 150 रूपये... सांगा दादा आमच्या सारख्या हातावर पोट असलेल्या माणसांनी जगायचे कसे.. हा आहे घरोघर पोळ्या लाटणाऱ्या सविताबाई यांचा सवाल.

पुण्यात संचारबंदी लागू असताना 'ती 'सकाळ' कार्यालयात पोहचली अन्...

सविताबाईं या पोळ्या लाटण्याचे काम करतात. त्यांचे पती टेम्पो चालवितात. दर महिन्याला त्यांच्या कुटूंबाची कमाई आठ ते दहा हजार रूपये. कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसापासून टेम्पो बंद आहे. त्यांमुळे पती घरीच आहेत. पैशाची चणचण भासत असताना त्यात या महागाईने पुरते कंबरडे मोडले आहे, असे सविताबाई सांगत होत्या. सविताबाईं हे एक प्रतिनिधीक उदाहरण आहे. अशा अनेक हातावर पोट असणाऱ्यांना या बंदचा फटका बसत असल्याचे यातून समोर आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बंद मधून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. त्या कमी पडू दिल्या जाणार नाहीत, असे वारंवार सरकार सांगते आहे. प्रत्यक्षात बाजारात परिस्थिती वेगळीच आहे, हे सविताबाईंच्या बोलण्यावरून समोर आले आहे.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास
शहराच्या मध्यवर्ती भागात जी परिस्थिती आहे, तशी उपनगरात देखील अशीच परिस्थिती आहे. मांजरी येथील संतोष खुडे म्हणाले.' किराणा दुकानदारांकडून लूट सुरू आहे. प्रत्येक वस्तूच्या भावात किलो मागे 30ते 40 रूपये वाढवून विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलीस, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून झाली. पण कोणतीहि कारवाई होत नाही.'

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय
केद्र आणि राज्य सरकारने वारंवार सागून देखील विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. माल मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. घाऊक दुकानदार याच्याकडून माल पाठविण्यास सुरू केले,तर हा प्रश्न राहणार नाही, असे एका दुकानदाराने नाव न देण्याच्या बोलीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com