झोनबाबतच्या नियमांची अंमलबजावणी कागदावरच...

corona logo1.jpg
corona logo1.jpg

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला व खानापूर (ता. हवेली) या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत तब्बल 1333 वर जाऊन पोहचली आहे. यापैकी 1071 रुग्ण बरे झाले आहेत तर 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे.       

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर खडकवासला व खानापूर या दोन्ही आरोग्य केंद्राच्या हद्दीत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खास करून नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नऱ्हे या गावांमधील रुग्णसंख्या वाढीचा वेग अतिशय जास्त आहे.  रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने कंटेनमेंट झोन, मायक्रो कंटेनमेंट झोन असे आदेश काढले; परंतु त्यातील नियमांची अंमलबजावणी मात्र कागदावरच राहिली. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्या माहितीनुसार,  सध्या खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या खडकवासला गावची एकूण रुग्ण संख्या 174 झाली असून यापैकी 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 134 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. किरकटवाडी गावची एकूण रुग्ण संख्या 179 झाली असून यापैकी 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 128 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

गोऱ्हे बुद्रूकची एकूण रुग्ण संख्या 36 असून 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. नांदोशी गावची एकूण रुग्ण संख्या 3 असून एका रुग्णावर उपचार सुरू आहेत तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नांदेड गावची एकूण रुग्ण संख्या 337 वर जाऊन पोहोचली असून 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 265 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग नऱ्हे येथे सर्वात जास्त असून एकूण रुग्ण संख्या 448 झाली आहे.यापैकी 61 रुग्णांवर उपचार सुरू असून 380 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
           

खानापूर आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या माहितीनुसार, खानापूर गावची एकूण रुग्ण संख्या 76 असून 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 73 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गोऱ्हे खुर्द उपकेंद्राची एकूण रुग्ण संख्या 38 असून 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 29 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. खामगाव मावळ उपकेंद्राची एकूण रुग्ण संख्या 25 असून 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आंबी उपकेंद्राची एकूण रुग्ण संख्या 17 असून 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने नव्याने आदेश काढून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायती व पोलिस प्रशासनाकडून काही प्रमाणात कार्यवाही सुरू झालेली आहे. मात्र कोणताही आदेश कागदावर न राहता सर्व यंत्रणांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करत रुग्णसंख्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या आवाहनाला नागरिकांनीही जबाबदारीपूर्वक प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com