अग्निशमन केंद्राला निधीची कमतरता

खराडी, पालिका आयुक्त लक्ष घालणार का?
अग्निशमन केंद्र
अग्निशमन केंद्रsakal
Updated on

वडगाव शेरी : गगन चुंबी इमारती असलेल्या खऱाडी, वडगाव शेरी, विमाननगर या भागात एकही अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. पुणे महापालिकेला मोठे कररूपी उत्पन्न देणाऱ्या खराडीत अग्निशमन केंद्राचे काम केवळ निधीच्या कमतरतेमुळे रेंगाळले असून पालिका आयुक्तांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

अग्निशमन केंद्र
इसीएचएस लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन सुविधा

खऱाडी, वडगाव शेरी, विमाननगर, खुळेवाडी, शेजारील उबाळेनगर, खांदवेनगर भागात मोठ्याप्रमाण बांधकामे झाली आहे. खराडी व विमाननगर भागात अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची गगुचुंबी कार्यालये आहेत. तसेच खराडीत अनेक तीस मजली रहिवासी इमारती झाल्या आहेत. बहुमजली मॉल, शाळा, दवाखाने यांची संख्या मोठी आहे. याठिकाणी दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास येरवड्यातून व पुण्यातून अग्निशमन दलाचे बंब बोलवावे लागतात. बंब येईपर्यंत घटनास्थळी आगीमुळे मोठे नुकसान होते. शिवाय येणाऱ्या बंबाला मोठ्या अंतरासोबक वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतो.

अग्निशमन केंद्र
हॉटेल मालकावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

यासाठी खराडीतील बाह्यवळण मार्गावर सर्वे क्रमांक 22 येथे अग्निशमन केंद्राचे काम दोन वर्षापुर्वी सुरू झाले. त्यासाठी अडीच कोटी निधीची तरदुत करण्यात आली होती. मात्र फक्त दिड कोटी निधी मिळाला. निधीच्या कमतरतेमुळे अजूनही निम्याहून अधिक काम अपुर्ण आहे. याबाबत पुणे महानगर पालिकेच्या भवन विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत महेंद्रकर म्हणाले, करोनामुळे निधी कमी मिळाला. अजुनही एक कोटी निधीची आवश्यकता आहे. त्यानंतर वर्षभरात काम पुर्ण होईल. आता पाण्याच्या टाक्या व रॅम्पचे काम सुरू आहे.

अग्निशमन केंद्र
तुमचे पैसे बॅंकेतही असुरक्षित?; पाहा व्हिडिओ

"मागे खऱाडीत मॉलला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. परंतु प्रत्येक वेळी आपण दैवावर भरवसा ठेवू शकत नाही. म्हणून खराडीतील अग्निशमन केंद्रासाठी पालिका आयुक्तांनी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा."

- मेहजबीन सय्यद ( सचिव, न्याती एम्पायर सोसायटी, खराडी)

"अग्निशमन केंद्र ही अत्यावश्यक गरज आहे हे आयुक्तांना कळत नाही का. यासाठी पुरेसा निधी देणे ही आयक्तांची जबाबदारी असून त्याना अधिकारही आहे. मागणी करूनही निधी मिळत नसल्याने मी आंदोलन करणार आहे."

- माजी आमदार बापु पठारे.

असे असेल खराडीतील अग्निशमन केंद्र -

जागा 1300 चौ.मी. क्षेत्रफळ, दुमजली इमारत. दोन उंच शिड्यांचे बंब आणि दोन टँकरचे बंब थांबण्याची व्यवस्था, दिड लाख लिटर पाण्याच्या टाक्या, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष आणि कार्यालय आणि वाहनतळ व्यवस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nirmala Nawale NCP appointment
Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Pune Municipal Corporation
Marathi News Esakal
www.esakal.com