Government officials conducting door-to-door verification for Ladki Bahini Yojana eligibility in Maharashtra.esakal
पुणे
Ladki Bahini Yojana: आता 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ सोडावाच लागेल, मोठी अपडेट समोर... काय आहेत निकष?
Ladki Bahini Yojana: Major Update on Eligibility: कठोर अंमलबजावणीमुळे गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, लाभार्थींच्या संख्येत मोठी कपात होणार हे निश्चित!
पुणे, ता. ३: मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाने नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, ४ तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

