

Heavy traffic builds up at Lagad Mala Chowk as the absence of a functioning signal
Sakal
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील लगड मळा चौकातील रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. सकाळ व सायंकाळच्या वेळी या भागात दररोज वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्ता, वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेच्या अभावामुळे वाहनचालकांना हा प्रवास त्रासदायक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत आहे. लगड मळा चौकातील जुना वाहतूक दिवा बंद केल्यानंतर येथील परिस्थिती अधिकच बिघडली आहे.