esakal | ऑनलाइन कुर्ता पडला लाखाला!
sakal

बोलून बातमी शोधा

kurtis1.jpg

नापसंत कपड्याचे पैसे परत मिळण्याऐवजी खात्यातून रक्कम लंपास

नारायणगाव येथील नेत्रतज्ज्ञ महिला डॉक्‍टरला ऑनलाइन कपडे खरेदी महागात पडली आहे. ऑनलाइन कपडे खरेदीनंतर झालेल्या व्यवहारातून महिला डॉक्‍टरच्या बॅंक खात्यातील 99 हजार 999 रुपयांची रक्कम परस्पर कपात झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन कुर्ता पडला लाखाला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : येथील नेत्रतज्ज्ञ महिला डॉक्‍टरला ऑनलाइन कपडे खरेदी महागात पडली आहे. ऑनलाइन कपडे खरेदीनंतर झालेल्या व्यवहारातून महिला डॉक्‍टरच्या बँक खात्यातील 99 हजार 999 रुपयांची रक्कम परस्पर कपात झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी ही माहिती दिली.

याप्रकरणी येथील डॉ. क्षितिजा प्रकाश वाली (सध्या रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत घोडे पाटील म्हणाले, की डॉ. वाली यांनी 29 जुलै रोजी एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून कुर्त्याची  ऑर्डर दिली होती. डॉ. वाली यांना 3 ऑगस्ट रोजी कुर्ता कुरिअरमार्फत मिळाला.

कुर्ता पसंत नसल्याने डॉ. वाली यांनी रिप्लेसमेंटसाठी संबंधितांस ऑनलाइन रिक्वेस्ट केली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी एक व्यक्ती नारायणगाव येथे येऊन कुर्ता घेऊन गेली. मात्र, पैसे परत न मिळाल्याचे डॉ. वाली यांनी 20 ऑगस्टला संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरच्या 07364996902 या क्रमांकावर संपर्क साधून सांगितले. त्यानंतर 08825176741 या क्रमांकावरून एका व्यक्तीने डॉ. वाली यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला एक लिंक पाठवतो, ही लिंक तुम्ही सेंड करा. तुमचे पैसे लगेच रिफंड होतील,अशी माहिती दिली. त्यानंतर 07364996902 या क्रमांकावरून डॉ. वाली यांच्या मोबाईलवर लिंक आली. लिंक ओपन केल्यानंतर डॉ. वाली यांच्या एचडीएफसीच्या बँक खात्यातून चार टप्प्यांत 99 हजार 999 रुपयांची रक्कम डेबिट झाली.

कुर्त्याचे पैसे मिळण्याऐवजी त्यांच्याच खात्यातून रक्कम डेबिट झाली आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. वाली यांनी एचडीएफसी बँकेशी संपर्क साधून डेबिट कार्ड व अकाउंट ब्लॉक केले.

loading image
go to top