
Festive rush in Pune markets ahead of Lakshmi Pujan and Padwa; traders ready with new stock as customers enjoy Diwali shopping.
Sakal
मार्केट यार्ड : दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी व्यापारी वर्गाची तयारी सुरू आहे. वर्षभराच्या नोंदीसाठी लागणाऱ्या चोपड्या, फुले, उसाचे धाट, केळीचे खुंट आदी पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात यंदा ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घराघरांत तसेच कार्यालये, कारखाने, दुकानांत उत्साह दिसून येत आहे. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या वस्तू उपनगरांतील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.