esakal | #PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा

बोलून बातमी शोधा

Pune-Metro

दोन हजार ८८९ कोटींची तूट
राज्य सरकारकडून एक हजार ५६१ कोटी रुपये आणि पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून एक हजार ३२८ कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे दोन हजार ८८९ कोटी रुपयांची तूट असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

#PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - वनाज ते रामवाडी आणि निगडी ते शिवाजीनगर या मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. परंतु, सरकारी संस्थांच्या अनास्थेमुळे या कामात अडथळे येत आहेत. या दोन्ही मार्गांवर काही ठिकाणी भूसंपादन रखडल्याने ‘महामेट्रो’ला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘दिशा कमिटी’ची बैठक झाली. खडकीजवळील महामार्गाचे विस्तारीकरण होत नसल्याने मेट्राचे ९०० मीटर लांबीचे काम रखडले आहे. हा विषय पुणे महापालिका आणि संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीअभावी प्रलंबित असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. 

लोहगावचे विमानतळ अखेर प्लॅस्टिकमुक्‍त 

कामगार पुतळा व राजीव गांधीनगर ८०० मीटर लांबीचे काम रखडले आहे. कामगार पुतळा परिसरात ८४ व राजीव गांधीनगर येथील १२७ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी एसआरए, पुणे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. मेट्रोच्या मंडई स्टेशनसाठी लंकेवाडा व पीडीसीसी बॅंक या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

आता दुसऱ्या पत्नीलाही द्यावी लागणार पोटगी

नगर रस्त्यावरील दोन ठिकाणी आवश्‍यक ती जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ३०० मीटर लांबीचे काम रखडले आहे. मालकी हक्काच्या वादामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मेट्राचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी हे भूसंपादनाचे विषय तत्काळ मार्गी लागणे आवश्‍यक असल्याचे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.

देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या  2023 पर्यंत 90 कोटींवर