
पिंपरी : ‘‘सततच्या कोंडीमुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. हिंजवडी, माण, म्हळुंगे, मारुंजी येथील रस्त्याच्या भूसंपादनाअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. एमआयडीसीने तातडीने याबाबत आपला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा,’’ असे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.