‘समृद्धी’च्या धर्तीवर होणार ‘एमएसआरडीसी’ रिंगरोडचे भूसंपादन

MSRDC
MSRDC

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. लवकरच मोजणी होऊन भूसंपादन सुरू करणार आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे भूसंपादन होणार असून पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर त्याचा विकास केला जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत रिंगरोडसाठीच्या जागेची मोजणी ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय झाला. ज्या तालुक्यांतून हा रिंगरोड जाणार आहे, तेथील प्रांत आणि तहसीलदारांची भूसंपादन अधिकारी म्हणून यापूर्वीच नेमणूक केली आहे. त्यांनी भूसंपादन होणाऱ्या गावातील महसूल रेकॉर्ड अपडेट करून घेतले आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर जागा मालकांना भरपाई दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा असेल रिंगरोड
१) पुणे व पिंपरीतील कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडची आखणी.
२) ‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे.
३) पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ) ते केळवडे (ता. भोर) दरम्यान असून तो मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्‍यातून जाणार.
४) पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरवात. हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. 
५) रिंगरोडवरून वेगवान आणि विना अडथळा प्रवास होण्यासाठी रस्त्यालगतच सीमाभिंत बांधणार.
६) सीमाभिंतीमुळे इतर वाहने तसेच प्राणी आत येणार नाहीत. 
७) त्याचबरोबर ठराविक ठिकाणावरून रिंगरोडवरती वाहने आणता येणार.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com