
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) आता धामणे, गोदुंबरे, दारुंब्रे, साळुंब्रे आणि सांगवडे या गावात नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वी प्राधिकरणाकडून सहा नगर रचना योजना शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या असून त्यापैकी चार योजनांना मान्यता मिळाली आहे. आता आणखी पाच नगर रचना योजना हाती घेण्यात येणार आहेत.