esakal | खरेदीदारांनो, दसऱ्याला दस्त नोंदणी सुरूच राहणार; नोंदणी महानिरीक्षकांच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Registration_Office

पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकण विभागातील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांनी त्यांच्या विभागातील दुय्यम निबंधक कार्यालये दसऱ्याच्या दिवशी सुरू ठेवण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

खरेदीदारांनो, दसऱ्याला दस्त नोंदणी सुरूच राहणार; नोंदणी महानिरीक्षकांच्या सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिक सदनिका, शेती आणि इतर मालमत्ता व्यवहारांच्या खरेदी-विक्रीस प्राधान्य देतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रविवारी (ता. 25) सरकारी सुट्टी असली तरी पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहतील, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकण विभागातील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांनी त्यांच्या विभागातील दुय्यम निबंधक कार्यालये दसऱ्याच्या दिवशी सुरू ठेवण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत. पुणे शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, हवेली क्रमांक 17, 21, 22, 23 आणि 25 येथील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहतील. 

पुणेकरांनो, सोनं लुटण्यासाठी छत्री घेऊन बाहेर पडा; दसऱ्याला वरुणराजा बरसणार!​

नाशिक येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 आणि नाशिक क्रमांक-3, ठाणे शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कल्याण क्रमांक 3, ठाणे ग्रामीणमधील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, भिवंडी क्रमांक 1, 2, 3 आणि उल्हासनगर क्रमांक-4 कार्यालय सुरू राहील. तसेच, रायगड-अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 आणि पनवेल क्रमांक-3 कार्यालयात दस्त नोंदणी सुरू राहील, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)