esakal | पुणेकरांनो, सोनं लुटण्यासाठी छत्री घेऊन बाहेर पडा; दसऱ्याला वरुणराजा बरसणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Rain

राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. एक-दोन दिवसांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे.

पुणेकरांनो, सोनं लुटण्यासाठी छत्री घेऊन बाहेर पडा; दसऱ्याला वरुणराजा बरसणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे गुरुवारी (ता.२३) वर्तविण्यात आला. शहराच्या काही भागात गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्या. 

शहरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडत आहेत. पण, त्याच वेळी उन्हाचा चटका वाढत आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमानाचा पारा 1.9 अंश सेल्सिअसने वाढून 33.1 अंश सेल्सिअस झाले. त्याच वेळी किमान तापमान 2.9 अंश सेल्सिअसने वाढून 20.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

समान वेतन, समान कामांचा प्रश्‍न मार्गी लागणार; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिले आश्‍वासन​

राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. एक-दोन दिवसांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. ती स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांवर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.२३) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शनिवारी (ता.२४) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहील. 

अखेर रवींद्र बऱ्हाटे फरारी म्हणून घोषित; बऱ्हाटेविषयी माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन​

सध्या राज्यातील काही भागांत सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. अकोला येथे 36.1 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमान कमी होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)