
Pune Land Survey
Sakal
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह पुणे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत पैसे भरून घेऊन वहिवाटीची मोजणी करून घेतलेल्या अर्जदारांना भूमिअभिलेख विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीच्या माध्यमातून एक संधी देऊन हद्द कायम करण्याबाबतची मोजणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही हद्द कायमची मोजणी करून न घेतल्यास त्यांची मोजणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांसह जागामालकांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.